नमस्कार मित्रांनो,
या जगामध्ये किती तरी प्रकारची फळे,भाज्या, वनस्पती आहेत. काही फळे भाज्या वनस्पतीं बद्दल आपल्याला माहिती असते तर काहीच बद्दल आपल्याला माहिती नसते.
त्याचबरोबर देश-विदेशात विविध प्रकारच्या भाज्या फळे त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांची शेती करून उगवल्या जातात. आपल्याला काही फळे व भाज्या इत्यादींबद्दल माहिती असते तर काही बद्दल माहिती नसते, अशी अनेक फळे भाज्या आहेत याबद्दल आपण फक्त ऐकून आहोत.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहे ज्याचे नाव आहे “ अवोकॅडो ” ( Avocado ). आजच्या लेखामध्ये आपण Avocado meaning in marathi पाहणार आहोत.
सर्वप्रथम आपण अवोकॅडो या फळाबद्दल माहिती जाणून घेऊ.
चला तर जाणून घेऊ Avocado Meaning in Marathi.
अवोकॅडो ( Avocado ) म्हणजे काय?
मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्या गरजेनुसार उगवल्या जातात.
पण अवोकॅडो हे नाव आपल्याला क्वचितच ऐकायला मिळते किंवा फार कुणाला त्या फळाबद्दल माहिती नाहीये आज आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो भारतात किंवा महाराष्ट्रात जरी या फळाबद्दल जास्त कोणाला माहिती नसले तरी विदेशामध्ये या फळाची चांगली मागणी आहे त्याच बरोबर हे एक लोकप्रिय फळ आहे.
मित्रांनो अवोकॅडो या फळाला वैज्ञानिक भाषेमध्ये पर्शियाना अमेरिका असे देखील संबोधले जाते असं म्हटलं जातं की या फळाची उत्पत्ती जवळपास सात हजार वर्षांपूर्वी दक्षिण मेक्सिको आणि कोलंबिया येथे झाली होती.
सुरुवातीला याचा आकार पाहून याला ॲलिगेटर पीयर्स असेदेखील नाव देण्यात आलं होतं. पूर्ण विश्वामध्ये याच्या खूप प्रजाती आता प्रचलित आहेत. ज्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय हास अवाकाडो ( Hass Avacado ) ही प्रजाती आहे.
त्याचमुळे या फळाची शेती विश्वातल्या अनेक देशांमध्ये केली जाते.
अवोकॅडो ( Avocado ) ची चव आणि माहिती :-
अवोकॅडो हे एक फळ असून याची चव तुपट लागते. याची चव उपट असल्या कारणाने त्याला बटर फूड म्हणून सुद्धा संबोधले जाते. विदेशामध्ये याला सुपरफुड ची उपमा देण्यात आली आहे. या फळामध्ये नैसर्गिक साखर अगदी कमी प्रमाणात असते. याव्यतिरिक्त यामध्ये फायबर त्याचबरोबर मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड इत्यादी पोषक तत्वांनी भरलेले असते.
अवोकॅडो चे सेवन आणि त्यामुळे होणारे फायदे |Avocado fruit benefits in marathi,:-
याचे सेवन ब्रेड टोस्ट किंवा आईस्क्रीम सोबत देखील केलं जातं. आता आपण अवोकॅडो खाल्ल्यानंतर होणारे फायदे जाणून घेऊ.
अवोकॅडो खाण्याचे फायदे :-
1) हृदय स्वास्थ्य :-
होय मित्रांनो अवोकॅडो हे फळ नियमित खाल्यानंतर तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल , हृदयासंबंधी चे रोग घालवण्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते.
वैज्ञानिकांनी केलेल्या एका रिपोर्टनुसार असे सिद्ध झाले आहे की अवोकॅडो हे फळ एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच आपल्या शरीरातील गुड कोले स्ट्रोल हे वाढवण्याचं काम करतो त्याचबरोबर बॅड कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचे काम करून आपल्या शरीराला वाचवण्याचं काम देखील करते.
शरीरातील एल डी एल कोलेस्ट्रॉल नष्ट करून हे फळ हृदयाचं स्वास्थ्य वाढवतं, आणि हृदयविकाराने पासून लांब ठेवतं. हृदयाचा आयुष्य वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच या फळाला तुमच्या जीवनशैलीचा एक हिस्सा बनवू शकता.
2) पचन स्वास्थ :-
उत्तम पचन स्वास्थ्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त ठरतं. अवोकॅडो या फळांमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते आणि हेच जेवण उत्तम पचन होण्यासाठी कारणीभूत ठरते. पोट दुखी साठी किंवा जर तुम्हाला जुलाब होत असतील तरीसुद्धा तुम्ही या फळाचे सेवन करू शकता हे फळ खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा आणि आराम मिळेल.
3) वजन कमी करते :-
वजन कमी करण्यासाठी अवोकॅडो हे फळ अत्यंत फायदेशीर सिद्ध झालेले आहे. एका सर्वेनुसार अशी माहिती समोर आली आहे की हे फळ व्यक्तीचे वजन नियंत्रणात ठेवते. हे फळ खाल्ल्यानंतर आपले body mass Index सुद्धा नियंत्रणात राहते. हे फळ मेटाबॉलिक सिण्ड्रोम च्या धोक्याला सुद्धा आळा घालते.
या फळांमध्ये असलेले मोनो सॅचूरेटेड फॅटी ऍसिड त्याचबरोबर फायबर आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
4) डोळ्यांच्या आरोग्यासाठी :-
अवोकॅडो फळ हे डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या फळांमध्ये लुटीन आणि जॅकस्थिन सारखे पदार्थ असतात जे की डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरु शकतात. या फळांमध्ये विटामिन इ ची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात आढळते जी आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.
5) कॅन्सर रोग नष्ट करण्यासाठी उपयुक्त :-
कॅन्सर सारखा महाभयंकर आजार होऊ नये यासाठी आपण अवोकॅडो या फळाचे सेवन करू शकतो. अवोकॅडो या फळांमध्ये अवोकॅटीन बी नामक एक तत्व असते जे लुकेमिया पेशींचा नाश करतात या लुकेमीया पेशी कॅन्सर साठी कारणीभूत ठरतात.
डॉक्टरांनी केलेल्या एका वेगळ्या अध्यायानानुसार असे समजले आहे की, अवोकॅडो हे फळ प्रोस्टेट कॅन्सर च्या पेशींच्या वाढीला आळा घालते. या फळांमध्ये असलेले मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कॅन्सरची जोखीम कमी करतात.
6) ओरल स्वास्थ्य :-
ओरल स्वास्थ म्हणजे तोंडाच्या किंवा तोंडाच्या आतील भागाच्या स्वास्थ्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते. या फळांमध्ये विटामिन डी फायबर आणि फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असतात जे आपल्या दातांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतात. त्याचबरोबर हिरडे दुखी व हिरड्यांच्या संक्रमणापासून सुद्धा हे फळ आपला बचाव करते.
7) हाडांचे स्वास्थ्य सुधारते :-
मित्रांनो हाडांच्या मजबुतीसाठी अवोकॅडो या फळाचे सेवन अत्यंत लाभदायक ठरू शकते. या फळांमध्ये बोरोन नावाचे विशिष्ट मिनिरल सापडते जे शरीरातील कॅल्शियम चे शोषण वाढवून आपल्या हाडांना अजूनही दणकट बनवते. या फळामध्ये क जीवनसत्व ( Vitamin K ) चे प्रमाण सुद्धा भरपूर असते, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.
8) लिव्हर (lever ) :-
मित्रांनो फायबर लिव्हरला स्वस्थ ठेवायचे काम करत असते आणि या फळांमध्ये सुद्धा फायबरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने याने आपले लिवर स्वस्थ राहते.
9) बौद्धिक विकास :-
अवोकॅडो हे फळ लहान मुलांच्या, तरुण मुलांच्या बौद्धिक विकासासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरले आहे. या फळांमध्ये असलेले मोनो सॅच्यूरेटेड फॅटी ऍसिड मानवी मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. अल्झायमर या रोगाला सुद्धा हे फळ प्रतिबंध करते.
10 ) चेहऱ्यावरील सुरकुत्या साठी उपयुक्त :-
मित्रांनो वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, तर अवोकॅडो या फळांमध्ये गरजेचे असलेले फॅटी ऍसिड त्याचबरोबर अवोकॅडो तेल हे त्वचेच्या सुरकुत्या साठी उपयुक्त ठरते. हे फळ खाल्ल्यानंतर तुमच्या त्वचेवरील घाव भरण्यास सुद्धा मदत होते.
तर मित्रांनो हे होते अवोकॅडो या फळाचे Top 10 फायदे पण आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की या फळाचे सेवन कसे करायचे? चला तर आताच जाणून घेऊयात या फळाचे सेवन आपण कसे करू शकतो.
अवोकॅडो ( Avocado ) फळाचा उपयोग कसा करावा? Avocado uses in Marathi
अवोकॅडो हे एक खास फळ आहे तरी सुद्धा याचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. उदाहरणार्थ हे फळ तुम्ही ब्रेड टोस्ट, ज्यूस, आईस्क्रीम, किंवा इतर गोड पदार्थ इत्यादींमध्ये टाकुन खाऊ शकता.
सकाळी नाश्त्याला ब्रेड ऑम्लेट सोबत, किंवा फ्रूट सलाड मध्ये ग्रील सँडविच, टोस्ट सँडविच इत्यादी मध्ये टाकून तुम्ही हे फळ खाऊ शकता.
तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला अवोकॅडो या फळाबद्दल माहिती हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा.
धन्यवाद.
Tags-avocado fruit benefits in marathi,Avocado uses in Marathi,एवोकैडो काय आहे? | Avocado Meaning in Marathi,अवोकॅडो ( Avocado ) म्हणजे काय?