क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning In Marathi

4.9/5 - (15 votes)

नमस्कार मित्रांनो,

 

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Meaning In Marathi

आपल्या जीवनामध्ये सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे, असा एकही माणूस या या भुतलावर क्वचितच सापडेल ज्याला श्रीमंत व्हायचं नाही किंवा पैसे नको आहेत. 

आज काल शिकलेला माणूस सतत आपले पैसे वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग निवडत असतो, मग ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करणे असू देत किंवा म्युचल फंड मध्ये असो, पण मित्रांनो आपण आपले पैसे वाढवण्यासाठी काय काय करू शकतो? किती आणि कशा प्रकारे आपले पैसे वाढवू शकतो? तर अशाच एका लोकप्रिय पद्धतीबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्याचं नाव आहे क्रिप्टो करेंसी ( Cryptocurrency ).

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांनी क्रिप्टो करेंसी हे नाव ऐकले असेल पण, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी या बद्दल एक वेगळाच भ्रम किंवा भीतीदायक असे चित्र आपल्या मनात बसवले आहे.

तर असे काहीही नसून ही एक उत्तम इन्व्हेस्टिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी ची लोकप्रिय पद्धत आहे. आणि आज आपण या लेखामध्ये “ क्रिप्टो करेंसी ”  म्हणजे काय हेच जाणून घेणार आहोत? त्याचे दीर्घाकालीन  मिळणारे  फायदे हे जाणून घेणार आहोत .

मित्रांनो सर्वप्रथम आपण 

क्रिप्टो करेंसी ची व्याख्या पाहूयात | cryptocurrency information in marathi

cryptocurrency information in marathi ,क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning In Marathi,Cryptocurrency wikipedia in marathi,digital currency meaning in marathi

क्रिप्टोकरन्सी ही एक एनक्रिप्टेड डेटा स्ट्रिंग आहे जी चलनाचे एकक दर्शवते. क्रिप्टो करेंसी या शब्दाचा अर्थ असा होतो की, क्रिप्टो म्हणजे सीक्रेट आणि करन्सी म्हणजे चलन. 

Physically याचे काहीही अस्तित्व नसते.ब्लॉकचेन नावाच्या पीअर-टू-पीअर नेटवर्कद्वारे त्याचे निरीक्षण आणि आयोजन केले जाते, जे व्यवहारांचे सुरक्षित खाते म्हणून देखील काम करते, उदा. खरेदी, विक्री आणि हस्तांतरण.. Bitcoin, Ether, Litecoin आणि Monero हे लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहेत. 

digital currency meaning in marathi

 तर मित्रांनो ही तर झाली क्रिप्टो करेंसी ची व्याख्या, ते म्हणजे नेमकं काय हे आता आपण सोप्या शब्दात जाणून घेऊ, क्रिप्टो करेंसी म्हणजे ( Digital Money)  म्हणजेच डिजिटल पैसा असलेली एक प्रणाली आहे. जी कम्प्युटर अल्गोरिदम वर बनवली गेली आहे. 

क्रिप्टो करेंसी आपण फक्त ऑनलाईनच खरेदी किंवा विक्री करू शकतो. यावर कुठलाही देश किंवा कुठल्याही सरकारचा कसलाही अधिकार किंवा नियंत्रण नाही.

क्रिप्टो करेंसी (cryptocurrency )म्हणजे काय? | cryptocurrency meaning in marathi

आजच्या घडीला जगातल्या सर्व देशांकडे स्वतःची मुद्रा ( currency ) आहे. जसे की भारताकडे रुपया आहे,  अमेरिकेचे डॉलर आहे, तर सौदी अरब कडे रियाल आहे. 

तर मित्रांनो अशाच प्रकारे जगातील इतर देशांकडे स्वतःची मुद्रा आहे. पण प्रश्न हा आहे कि करन्सी म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो करेन्सी ( currency )म्हणजे एक अशी धन प्रणाली, जिला सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे. 

आणि त्या देशातील लोकांद्वारे धन स्वरूपात वापर केली जात असावी. त्याचबरोबर त्याची काहीतरी व्हॅल्यू ( value ) किंमत असावी यालाच करन्सी currency म्हटले जाते. अर्थात ज्याच्या बदल्यात आपण एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतो, ती currency आहे.

क्रिप्टो करेंसी (Cryptocurrency wikipedia in marathi) –

क्रिप्टो करेंसी एक आभासी मुद्रा आहे, जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या सिद्धांतावर काम करते. 

क्रिप्टो करेंसी ही कम्प्यूटर फाईलच्या स्वरूपात सेव (save) असते. यातील प्रत्येक खरेदी-विक्रीचे डिजिटल सिग्नेचर (signature )द्वारा वेरिफिकेशन केली जाते. ऑनलाईन या ट्रांजेक्शन चे रेकॉर्ड ठेवले जातात. क्रिप्टो करेंसी एक virtual currency म्हणजेच आभासी मुद्रा असल्याकारणाने, यास क्रिप्टोग्राफी द्वारे सुरक्षित केले जाते आणि याला कॉपी करणे जवळपास अशक्य आहे.

 क्रिप्टो करेंसी व्हॅल्यू  ( value of cryptocurrency ) :-

 क्रिप्टो करेंसी ला आपण नोटा किंवा चिल्लर मध्ये प्रिंट करू शकत नाही, तरीसुद्धा तिची स्वतःची वेगळी value आहे. या मार्फत तुम्ही नक्कीच सामान खरेदी करू शकता इन्व्हेस्ट करू शकता त्याचबरोबर ट्रेड सुद्धा करू शकता. 

परंतु तुम्ही याला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकत नाही किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकत नाही कारण हे सर्व ऑनलाईन असते. आणि म्हणूनच याला Digital money, virtual money किंवा electronic money सुद्धा म्हटले जाते. 

जर याच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर याची किंमत आपल्या चलनी नोटांपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. काहीकाही क्रिप्टो करेंसी ची किंमत तर डॉलर पेक्षा सुद्धा हजारो पटींनी जास्त आहे. 

पण याची किंमत दिवसभरातून भरपूर वेळा बदलत असते ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे. व यामुळेच यामध्ये कमालीची अस्थिरता आहे.

Cryptocurrency Market – क्रिप्टो करेंसी मार्केट –

चला तर मित्रांनो आता आपण क्रिप्टो करेंसी मार्केट बद्दल थोडक्यात  जाणून घेऊ.

क्रिप्टो करेंसी मार्केट म्हणजे अशी जागा जिथे Cryptocurrencies ची खरेदी आणि विक्री केली आणि ट्रेडिंग केली जाते. याला क्रिप्टो करेंसी एक्सचेंज, डिजिटल करेंसी एक्सचेंज ( DCE ), कॉइन मार्केट आणि क्रिप्टो मार्केट या नावाने देखील ओळखले जाते. 

इथे तुम्ही मोनेरो, इथेरियम, बिटकॉइन, रेड कॉइन,  लाईट कॉइन, व्हॉइस कॉइन इत्यादी प्रकारच्या क्रिप्टो करेंसी ची खरेदी-विक्री करू शकता त्याचबरोबर यामध्ये इन्वेस्ट देखील करू शकता.

क्रिप्टो करेंसी एक्सचेंज साठी तुम्हाला मुख्यतः क्रेडीट कार्ड,  वायर ट्रान्सफर, किंवा डिजिटल पेमेंट स्वीकार्य केले जाते. इथे तुम्ही तुमच्या चलनी नोटांचे रूपांतर क्रिप्टो करेंसी मध्ये किंवा क्रिप्टो करेन्सी चे रूपांतर चलनी नोटांमध्ये करू शकता. खालील वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या गोष्टी करू शकता.

Bitcoin

Kraken

Bithumb

Bitterex

Cucoin

Bitflyer

 या काही अतिशय  Popular आणि विश्वसनीय अशा, क्रिप्टो करेंसी मार्केट आहेत पण या व्यतिरिक्त सुद्धा अशा अनेक शेकडो प्लॅटफॉर्म तुम्हाला google वर उपलब्ध  होतील.

तर मित्रांनो ही आज आपण क्रिप्टो करेंसी म्हणजे काय व क्रिप्टो करेंसी मार्केट बद्दल माहिती बघितली, मला अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घेण्यास आवडेल ते आम्हाला कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा.

धन्यवाद.

 

Video Source – Youtube

Tags – cryptocurrency information in marathi,क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning In Marathi,Cryptocurrency wikipedia in marathi,digital currency meaning in marathi

2 thoughts on “क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning In Marathi”

Leave a Comment