म्युच्युअल फंड म्हणजे काय | म्युच्युअल फंड मराठी अर्थ

Rate this post

नमस्कार मित्रांनो,

पैसा, आजच्या घडीला पैसा कोणाला नको आहे? क्वचितच असा कोणी असेल ज्याला पैश्याची गरजच नाही, पैसा म्हटलं की ओघाओघाने saving सुद्धा आलंच, आणि saving म्हटलं की म्युचल फंडचं नाव नेहमी घेतलं जातं.

आज आपण बघणार आहोत, म्युचल फंड म्हणजे नेमकं काय? त्याचे फायदे, योग्य म्युचल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी? कुठे करावी? इत्यादी.

म्युच्युअल फंड म्हणजे काय

 तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात म्युचल फंड म्हणजे नेमकं काय?

 मित्रांनो साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर म्युचल फंड म्हणजे अनेक लोकांकडून जमा केलेला पैसा होय. आज आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र तथा भारतामध्ये अशी अनेक लोक आहेत त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत परंतु ते कुठे गुंतवायचे ज्ञान नसल्यामुळे, त्यांचा पैसा ते वाढवू शकत नाही. 

खूप साऱ्या लोकांना शेअर मार्केटचे  ज्ञान नसल्यामुळे, ते योग्य ठिकाणी इनवेस्ट करून, पैसे कमावू शकत नाही. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट  करण्यासाठी, आपल्याला टेक्निकल आणि फंडामेंटल Anaylisis ची गरज असते. 

 

त्याचबरोबर यासाठी तुम्हाला तुमचा भरपूर वेळ देखील द्यावा लागतो, त्यामुळे ज्यांना शेअर मार्केटचे ज्ञान नाही त्याचबरोबर ज्यांच्याकडे जास्त वेळ देखील नाही त्यांच्यासाठी म्युचल फंड हे इन्व्हेस्टिंग साठी  एक उत्तम साधन आहे. 

त्याचबरोबर हे इतर गोष्टींपेक्षा safe म्हणजेच सुरक्षित देखील आहे. थोडक्यात म्युचल फंड म्हणजे आपण आपला पैसा एखाद्या  तज्ञ व जाणकार व्यक्ती कडे देतो, जे स्वतः शेअर मार्केट, विविध bonds, इत्यादी मध्ये आपले पैसे गुंतवतात व आपल्या हीस्याचा  नफा आपल्याला मिळवून देतात. या तज्ञ लोकांचा गुंतवणुकी चा अभ्यास गाढा असतो.

mutual fund meaning in marathi,mutual fund in marathi, म्युच्युअल फंड म्हणजे काय,mutual fund marathi

म्युचल फंड चे फायदे?

तर मित्रांनो आता आपण म्युचल फंड चे फायदे जाणून घेणार आहोत.

1) सर्वप्रथम हे अगदीच कमी जोखमीचे आहे.

2) म्युचल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक अगदी 500 रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत करू शकता, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

3) आपले पैसे योग्य म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचा वेळ व पैसा दोन्ही वाचतो.

4) तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो.

5) सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत कोणीही यात गुंतवणूक करू शकतो.

 चला तर आता आपण म्युचल फंड्स चे विविध प्रकार जाणून घेऊ.

म्युचल फंड्स चे मुख्यतः तीन प्रकार पडतात, ते पुढीलप्रमाणे –

1) इक्विटी म्युच्युअल फंड (equity Mutual Fund) 

2) डेट म्युचल फंड ( debt Mutual Fund) 

3) बॅलेन्स / हायब्रीड फंड ( balance hybrid fund )

या तिन्ही मध्ये तुम्ही तुम्हाला जो हवा आहे तो प्रकार निवडू शकता आणि त्यात पुन्हा, ओपन आणि क्लोज असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

Open या प्रकारामध्ये तुम्ही घेतलेला म्युचल फंड केव्हाही तुमच्या मर्जीने विकू शकता.

 तर याउलट क्लोज या प्रकारामध्ये तुम्ही घेतलेला म्युचल फंड एका विविध कालावधी नंतरच विकू शकता. मग याचा कालावधी तीन महिने, सहा महिने व वीस-तीस वर्षापर्यंत देखील असू शकतो.

इक्वीटी म्युचल फंड मध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात.

1) लार्ज कॅप फंड ( large cap fund) 

2) मीड कॅप फंड (midcap fund)

3) स्मॉल कॅप फंड( small cap fund ) 

 1) लार्ज कॅप फंड- लार्जकॅप फंड म्हणजे तुमचे पैसे अशा कंपनीत गुंतवले जातात ज्यांचे कॅपिटलायजेशन दहा हजार करोड पेक्षा जास्त आहे.

 2) मिड कॅप फंड – मिडकॅप फंड मध्ये तुमचे पैसे अशा कंपनीमध्ये गुंतवले जातात जी चे कॅपिटलायजेशन दोन हजार ते दहा हजार करोड यांच्यामध्ये आहे.

3)  स्मॉल कॅप फंड – स्मॉल कॅप फंड मध्ये तुमचे पैसे अशा कंपनीमध्ये गुंतवले जातात जी चे कॅपिटल डायजेशन दोन हजार करोड पेक्षा कमी आहे.

डेट म्युचल फंड – ( debt mutual fund )


डेट म्युच्युअल फंड सर्वांमध्ये सुरक्षित प्रकार मानला जातो, कारण यामध्ये तुमचे पैसे गव्हर्मेंट किंवा सरकारी बॉन्डस ( bonds ), डिबेनचर्स, मनी मार्केटिंग इत्यादींमध्ये गुंतवला जातो. याचा इंटरेस्ट रेट सुद्धा बऱ्यापैकी सारखाच असतो.

हायब्रीड बॅलन्स फंड – (hybrid balance fund )


हायब्रीड किंवा बॅलेन्स या फंडमध्ये तुमचे अर्ध्याहून जास्त पैसे हे इक्विटी म्युचल फंड आणि उर्वरित रक्कम ही म्युचल फंड मध्ये गुंतवली जाते. जवळपास 65 टक्के रक्कम इक्विटी म्युचल फंड मध्ये गुंतवली जाते.

 मित्रांनो म्युचल फंड मध्ये तुम्ही कधीही एकटे नसता आपल्या सारखे शेकडो,  हजारो लोकांनी पैसे गुंतवलेले असतात त्यामुळे फंड मॅनेजरला आपले पैसे व्यवस्थित विविध कंपन्या बॉन्डस मध्ये गुंतवणूक करता येतात.

यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही नक्कीच  दीर्घकाळासाठी उत्तम परतावा मिळू शकता.

म्युचल फंड मध्ये दोन प्रकारे इनव्हेस्टमेंट केली जाऊ शकते.

एक म्हणजे एस आय पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन ( systematic Investment plan ) आणि दुसरे म्हणजे तुम्ही डायरेक्ट लमसम अमाऊंट किंवा मोठी रक्कम एकाच वेळी यामध्ये गुंतवू शकता आणि नफा मिळवू शकता. 

SIP ( systematic Investment plan ) – ( सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन )


SIP मध्ये तुम्ही महिन्याला 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरु केल्यानंतर वेळच्यावेळी दर महिन्याला तुमच्या अकाउंट मधून तुम्ही ठरवून दिलेली रक्कम ही काढून घेतली जाईल.

उदाहरणार्थ , जर समजा तुम्ही महिन्याला प्रत्येक एक तारखेला  एक हजार रुपयाची एसआयपी चालू केली , तर तुमच्या बँक अकाउंट मधून प्रत्येक एक तारखेला एक हजार रुपये हे डेबिट केले जातील आणि म्युचल फंड मध्ये गुंतवले जातील, वेळोवेळी तुम्हाला याचा नफा, प्रॉफिट हा मिळत असतो.

Lumsum Amount -(  लमसम अमाऊंट  ) 


तर लम सम या प्रकारा मध्ये तुम्हाला वेळोवेळी पैसे गुंतवण्याची गरज नसते तुम्ही एकाच वेळी पाच हजार, दहा हजार अशी मोठी रक्कम गुंतवून ठेवू शकता व याचा तुम्हाला दीर्घकाळानंतर नक्कीच फायदा मिळेल. SIP प्रमाणे तुम्हाला यात वेळोवेळी गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

म्युचल फंड चे नुकसान?

तर मित्रांनो जिथे गुंतवणूक येते तिथे नफा व नुकसान हे दोन्ही आलेच, तसं पाहायला गेलं तर म्युचल फंड मध्ये रिस्क म्हणजेच जोखीम नक्कीच कमी आहे शिवाय तुमचा वेळ सुद्धा भरपूर वाचतो, पण म्हणून यात तोटा होऊच शकत नाही असं नाही आहे. 

मित्रांनो इक्वीटी म्युचल फंड मध्ये तुमचा पैसा हा स्टॉप मार्केट किंवा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक जातो व स्टॉक मार्केट हे सातत्याने बदलत असते, याचा 100% अंदाज हा तज्ञ फंड मॅनेजर सुद्धा लावू शकत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला क्वचित तोटा होऊ शकतो. त्याच बरोबर ठराविक वेळेच्या अगोदर पैसे काढून घेतल्यामुळे तुम्हाला पेनल्टी किंवा दंड भरावा लागू शकतो. मित्रांनो हेच म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे नुकसान आहेत. 

 म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी ? 

 मित्रांनो म्युचल फंड हे गुंतवणूक करण्यासाठी जरी सुरक्षित असले तरी आपणास सर्वांना एक काळजी ही नेहमी घ्यावी लागते ती म्हणजे उत्तम फंड मॅनेजर शोधणे. जर आपण उत्तम फंड मॅनेजर शोधला नाही तर आपल्याला कमी नफा मिळण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपल्याला जपून पाऊल टाकायचे असते.  

एक उत्तम फंड मॅनेजर आपल्या पैशाची योग्यरित्या गुंतवणूक करून आपल्याला पैसे मिळवून देत असतो. आणि याच्या बदल्यात म्युचल फंड करणाऱ्या कंपन्या या आपल्याला वार्षिक तसेच इतर काही शुल्क आकारले जाते आणि या सर्वांनाच एक्सपेन्स रेशियो म्हटले जाते. 

तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी, फंड मॅनेजर एक विशिष्ट कमिशन आकारतात,  उदाहरणार्थ जर एखाद्या प्लॅनमध्ये दोन टक्के कमिशन आकारणार असतील, आणि तुम्ही वर्षाला शंभर रुपयांची गुंतवणूक केली असेल तर दोन टक्क्याने प्रमाणे तुमचे दोन रुपये शुल्क आकारले जाईल. तर मित्रांनो एवढी काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागते.

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा न घाबरता म्युचल फंड मध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करा, आणि भरपूर पैसे कमवा. तुम्हाला आमच्या कडून भरपूर शुभेच्छा.

धन्यवाद.

तुम्ही ही माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्येही पाहू शकता – 

Video Source – Marathi Shala

Leave a Comment