फ्रीलान्सर म्हणजे काय | freelancer meaning in marathi

4.8/5 - (12 votes)

बऱ्याच वेळा आपल्याकडे खूप वेळ उपलब्ध असतो व आपण इंटरनेटवर घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग शोधत असतो ,परंतु आपल्याला समजत नाही की या वेळेमध्ये आपण चांगल्या प्रकारे पैसे कशाप्रकारे कमवू शकतो. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण करत असताना पैशांची गरज असते परंतु तेव्हा आपल्याला माहीत नसते घरबसल्या पैसे कमावण्याचा मार्ग! चला तर मग या लेखामध्ये जाणून घेऊया असाच एक मार्ग फ्रीलांसर म्हणजे काय freelancer meaning in marathi.

आपण इंटरनेटवर बरेच वेळा बघत असतो की बरेच व्यक्ती घरबसल्या लाखो रुपये कमवत आहेत व यासाठी ते फ्रीलान्सिंग चा उपयोग करत आहे. परंतु आपल्याला फ्रीलान्सर म्हणजे काय हेच माहीत नसते त्यामुळे आपण फ्रीलान्सिंग चा विषय डोक्यातून काढून पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधत बसतो परंतु तुम्हाला माहित आहे का फ्रीलान्सिंग करणे खूप सोपे आहे व या लेखामधील माहितीच्या आधारे तुम्हीपण हजारो ते लाखो रुपये महिना कमवू शकता.

फ्रीलान्सर म्हणजे काय | Freelancer meaning in marathi

जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या मध्ये उपस्थित असलेल्या कौशल्य, ज्ञानाचा उपयोग करून इतर व्यक्तींना काही सेवा प्रदान करत असतो तेव्हा त्याला फ्रीलान्सिंग असे म्हणतात व फ्रीलान्सिंग करणाऱ्या व्यक्तीला फ्रीलान्सर असे म्हटले जाते .

फ्रीलान्सर वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग करून फ्रीलान्सिंग करत असतो त्यामध्ये काही कौशल्ये आहे- ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट रायटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, व्हिडिओ तसेच फोटो एडिटर, प्रोग्रामिंग, अँप डेव्हलपमेंट, seo इत्यादी

उदाहरण – जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल तर तुम्ही विविध युट्युबर , कन्टेन्ट क्रियेटर यांना संपर्क साधून त्यांच्यासाठी व्हिडिओ एडिटिंग करू शकता व त्यांच्याकडून तुमच्या कामाच्या मोबदल्यात काही शुल्क आकारू शकतात.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मध्ये कोणतेही विशेष कौशल्य आहे तर तुम्ही त्या कौशल्याच्या आधारावर तुमची सेवा विविध लोकांना प्रदान करून घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.

freelancer meaning in hindi, freelancer in marathi

फ्रीलान्सिंग म्हणजे काय?

फ्रीलान्सर द्वारा प्रदान केल्या गेलेल्या सेवेला फ्रीलान्सिंग असे म्हटले जाते. फ्रीलान्सिंग मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही सेवा प्रदान करतो व त्याद्वारे शुल्क आकारतो. फ्रीलान्सिंग करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्‍यकता नसते परंतु व्यक्ती द्वारे फ्रीलान्सिंग साठी आवश्यक गुणवत्ता निर्धारित केले जाते. फ्रीलान्सिंग आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.

फ्रीलान्सर कोण कोणते काम करू शकतात?

Freelancer ते प्रत्येक कार्य करू शकतात जे ऑनलाईन करता येऊ शकते व त्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते. फ्रीलान्सर नवनवीन कौशल्यांचा उपयोग करून पैसे कमवू शकतो तसेच काहि नविन ट्रेंड चा फायदा घेऊन त्यामधील कौशल्ये शिकून देखील फ्रीलांसर पैसे कमवू शकतात.

सर्वोत्तम फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फ्रीलान्सिंग एक लोकप्रिय करियर ऑप्शन बनत चालला आहे त्यामुळे अनेक फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म इंटरनेटवर उपलब्ध आहे काही महत्त्वाचे फ्रीलान्सिंग प्लेटफार्म पुढीलप्रमाणे-

• truelancer

• guru

• up work

• fiverr

• Flexjob

• LinkedIn

• people per hour

• freelancer

याव्यतिरिक्त अनेक फ्रीलान्सिंग प्लेटफार्म मार्केटमध्ये उपलब्ध आहे परंतु मी तुम्हाला वरील पैकी एक किंवा दोन फ्रीलान्सिंग प्लेटफार्म च्या मदतीने कार्य करण्याचा सल्ला देत आहे कारण याद्वारे तुम्ही वेगात प्रगती करू शकाल.

आपण फ्रीलान्सर कसे बनू शकतो?

आतापर्यंत आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय तसेच फ्रीलान्सर कोणाला म्हणावे हे जाणून घेतले, त्यामुळे आता आपण जाणून घेऊया आपण कशाप्रकारे एक चांगला फ्रीलान्सर बनु शकतो. चांगला फ्रीलान्सर बनण्यासाठी तुम्हाला पुढील मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे असते

1. आपल्याला कोणत्या गोष्टीची जास्त आवड आहे त्याचा शोध घ्या

2. आता आपल्या आवडत्या गोष्टी संबंधी वेगवेगळी कौशल्ये प्राप्त करा . उदाहरणार्थ जर तुम्हाला फोटोग्राफी संबंधी आवडत असेल तर तुम्ही फोटो एडिटिंग शिकू शकता.

3. एकदा तुम्ही आवश्यक कौशल्य शिकले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही तुम्हाला निरंतर शिकत राहावे लागेल

4. आता तुम्हाला कोणत्याही कौशल्यात चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही वर दिलेल्या फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा व क्लाइंट शोधण्यास सुरुवात करा

5. चांगल्या प्रकारे फ्रीलान्सिंग काढण्यासाठी व क्लाइंट शोधण्यासाठी तुम्ही इतर फ्रीलान्सर ला वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहा .

6. तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करत असाल व काही प्रमाणात फेमस झाल्यावर तुम्ही तुमच्या स्वतःविषयी वेबसाईट बनवून पर्सनल ब्रँड बनवू शकता व लॉंग टर्म साठी असे करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

7. आता फ्रीलान्सिंग करत असताना तुम्हाला काही निगेटिव फीडबॅक भेटतील ज्याच्यावर तुम्ही विचार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे असते त्यामुळे सर्व फीडबॅक सकारात्मक दृष्टीने घ्या .

फ्रीलान्सर बनण्याचे फायदे | advantages of freelancing in Marathi 

फ्रीलान्सर बनल्यामुळे तुम्हाला वित्तीय सहायता तर मिळतेच पण याच बरोबर फ्रीलान्सिंग करण्याचे खूप सारे फायदे देखिल आहे ते पुढीलप्रमाणे

• आपण स्वतः बॉस असतो 

विचार करा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात व बॉस तुमच्याकडून जास्त काम करण्यासाठी खूप प्रेशर देत आहे तेव्हा अशा वातावरणामध्ये काम करायला कोणाला चांगले वाटेल. याउलट जर आपण फ्रीलान्सिंग करत असाल तर आपल्या मनावर आहे की किती काम करायचे व किती कमवायचे, आपण जास्त काम करून जास्त पैसे कमवू शकतो कधीकधी आराम करू वाटला तर आपण आराम देखील करू शकतो

• क्लाइंट बरोबर काम करण्याचे स्वतंत्र

कधीकधी कंपनीच्या प्रेशरमुळे आपल्याला अशा क्लायंट बरोबर तेथील काम करावे लागते ज्या बरोबर आपल्याला काम करण्याची बिलकुल इच्छा नसते त्यामुळे आपण फ्रीलान्सिंग करत असताना अशा क्लायंट बरोबर काम करू शकतो ज्या बरोबर काम करून आपल्याला आनंद भेटतो व पैसे देखील जास्त येतात.

• पैसे कमावण्याचे स्वातंत्र्य

फ्रीलान्सिंग मध्ये आपण जेवढे जास्त काम करू तितके जास्त आपण पैसे कमवू शकतो तसेच जर आपल्या मध्ये काही विशिष्ट कौशल्य असतील तर आपण खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त पैसे देखील कमवू शकतो.

• अनुभव वाढतो 

जेव्हा आपण फ्रीलान्सिंग करत असतो तेव्हा आपल्याला विविध लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव भेटतो व त्यामुळे आपोआप आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान मिळत असते तसेच सोसायटीमध्ये कोणा बरोबर कसे वागावे हे देखील कळते, सहाजिकच आपले व्यक्तिमत्त्व फ्रीलान्सिंग मुळे जास्त खुलते.

• वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाचा ताळमेळ 

जेव्हा आपण फ्रीलान्सिंग करत असतो तेव्हा आपल्या हातात असते की आपल्याला केव्हा काम करायचे, किती वेळ काम करायचे, कोणाबरोबर काम करायचे व कधी सुट्टी घ्यायची, त्यामुळे साहजिकच आपण आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे वेळ देऊ शकतो व त्यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाचा ताळमेळ साधणे शक्य होते.

VIDEO SOURCE – YOUTUBE

आज आपण काय शिकलो ? सारांश 

आज आपण या लेखाद्वारे जाणून घेतले की घरबसल्या पैसे कमावणे खूप सोपे आहे व त्याचाच एक मार्ग आहे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो तसेच फ्रीलान्सिंग करण्यासाठी वेळेचे बंधन नसते त्यामुळे फ्रीलान्सिंग एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो.

फ्रीलान्सर म्हणजे काय ? Freelancer meaning in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा व हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच पैसे कमवण्याची साठी वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील लेखामध्ये.

Leave a Comment