NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi

Rate this post

NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi

ज्या प्रकारे क्रिप्टो करेंसी जगभरामध्ये धुमाकूळ घालत आहे तेव्हा यामध्येच एक नवीन नाव पुढे येत आहे ते म्हणजे NFT. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण NFT द्वारे लाखो रुपये कमवू शकतो त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेऊया NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi.

कधी कधी आपल्या मनात अशी शंका येऊ शकते की क्रिप्टो करेंसी आणि NFT हे एकच आहेत काय? याचे उत्तर आहे नाही NFT एक non fungible टोकन असतात त्याउलट क्रिप्टो करेंसी हे fungible टोकन असतात याविषयी आपण अधिक माहिती पुढे जाणून घेऊया.

NFT बद्दल अनेक तज्ञांचे वेगवेगळी मते आहेत म्हणजेच काही तज्ञांना वाटते की NFT क्रिप्टो करेंसी प्रमाणे जगभरात प्रचलित होईल याउलट काही तज्ञांना वाटते की हे तंत्रज्ञान जास्त कमाल करू शकणार नाही.NFT आणि क्रिप्टो करेंसी बनवण्यासाठी एकाच तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला असतो.

NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi,NFT meaning in hindi

NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi

NFT चे पूर्ण स्वरूप आहे Non Fungible Token. NFT हे एक डिजिटल product ची मालकी दर्शवण्यासाठी उपयुक्त आहे.  डिजिटल प्रॉडक्ट मध्ये व्हिडिओ, चित्रे, कार्टून तसेच इतर डिजिटल कलेचा समावेश असू शकतो.

जर आपण एखादे युनिक चित्र बनवले व ते NFT द्वारे दुसऱ्या व्यक्तीस विकले तर आपण तेच सेम चित्र पुन्हा NFT वर अपलोड करून त्यावर मालकी दाखवू शकत नाही म्हणजेच आपण विकलेल्या चित्राचे स्वामित्व नवीन मालकाकडे जाते.

NFT तंत्रज्ञानाद्वारे आपण कोणतीही भौतिक वस्तू खरेदी करत नाही या उलट आपण इंटरनेटवर उपस्थित आभासी वस्तू खरेदी व विक्री करत असतो.NFT तंत्रज्ञान प्रचलित होत आहे कारण हे ब्लॉकचेन वर आधारित आहे.

विविध अर्थतज्ञ यांचे म्हणणे आहे की NFT व्यावहारिक पारदर्शकतेसाठी खूप महत्त्वाचे आहेत तसेच काही लोक unique identification च्या विरोधात आहेत कारण त्यांचे म्हणणे आहे की डिजिटल स्वामित्व हे अस्थाई असून त्याला कोणतेही भविष्य नाही.

NFT कशा प्रकारे काम करतो?

NFT फॉर्म मध्ये विविध घटकांना विविध कॅटेगिरी मध्ये विभाजीत केले जाते म्हणजेच आर्ट, गेम, व्हिडिओ, डॉक्युमेंट इत्यादी विविध कॅटेगिरी केलेल्या असतात.

आपण डिजिटल दुनियेतील कोणत्याही गोष्टीची नोंदणी NFT मध्ये करू शकतो.

NFT ब्लॉकचेन तंत्रज्ञान वर कार्य करतो त्यामुळे NFT शी निगडीत सर्व व्यवहार क्रिप्टो करेंसी मध्ये केले जातात. 

NFT एक प्रकारचे बँकेसारखे डिजिटल लॉकर आहे परंतु हे बँके पेक्षा वेगळे आहे कारण यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

NFT डिजिटल दुनिया आणि कलेचा संगम आहे. जेव्हा आपण आपली वैशिष्ट्यपूर्ण कला NFT व नोंदणीकृत करतो तेव्हा आपल्याला त्या कलेचे डिजिटल दुनिया मध्ये स्वामित्व प्राप्त होते व त्या कलेचे सर्व अधिकार संबंधित मालकाकडे प्रस्थापित होतात.

NFT द्वारे नोंदणी केलेल्या कलेचा मालक हवे तेव्हा ती कला इतर कोणालाही विकू शकतो परंतु तीच कला पुन्हा NFT वर अपलोड करू शकत नाही यामुळे डिजिटल दुनिया मध्ये एकच युनि्क कला कॉपी होण्याचा धोका कमी होतो.

आपण स्वतः NFT कशाप्रकारे करू शकतो?

आपण स्वतः NFT तयार करून त्याद्वारे पैसे कमवू शकतो त्यासाठी खूप सोपी प्रक्रिया आहे ते पुढीलप्रमाणे –

• आपले डिजिटल टोकन बनवा

• त्याला NFT प्लॅटफॉर्मवर अपलोड करा

• तुमचा NFT विकण्यासाठी तयार!

सर्वात प्रथम आपल्याला कोणत्याही चांगल्या डिजिटल कलाकृतीची निर्माण करायचे आहे व त्यासाठी उपयुक्त ब्लॉकचैन चा शोध घ्यायचा आहे. सर्वात जास्त उपयोगात येणारी क्रिप्टो करेंसी इथेरियम आहे व सर्वात जास्त NFT मार्केट प्लेस मध्ये इथेरियम चा उपयोग होतो.

आता आपण इथेरियम वॉलेट च्या मदतीने https://opensea.io/ वर अकाउंट बनऊन NFT टोकन निर्माण करू शकतो व त्या टोकन ची नीलामी करू शकतो तसेच आपण ते NFT निश्चित रकमेमध्ये विकू शकतो.

NFT चा फायदा

NFT टोकन चे अनेक फायदे आहेत त्यामधील काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे –

NFT  तुमचे डिजिटल स्वामित्व निर्माण करू शकतो व त्यामध्ये कोणताही व्यक्ती हस्तक्षेप किंवा छेडछाड करू शकत नाही.

NFT टोकन खूप विश्वासार्ह असतात म्हणजेच हे टोकन तुम्हाला issue झाल्यानंतर कोणीही चोरी करू शकत नाही.

NFT टोकन खूप सोप्या पद्धतीने ट्रान्सफर केले जाऊ शकते त्यामुळे selling प्रक्रियेमधील समस्या कमी होतात.

NFT चा तोटा

NFT विषयी फायदे जाणून घेतल्यानंतर आपण याचे तोटे देखील जाणून घेऊया ते पुढील प्रमाणे आहेत

• NFT एक नवीन संकल्पना आहे त्यामुळे ही संकल्पना किती पट कार्य करेल या विषयी तज्ञांना शंका आहे.

• कोणतेही डिजिटल करन्सी ची गॅरंटी कुणीही घेऊ शकत नाही त्यामुळे NFT च्या किमती मध्ये चढ-उतार येऊ शकतो.

• NFT तंत्रज्ञान पूर्णता ब्लॉकचेन वर आधारित आहे म्हणजेच भविष्यात जर या तंत्रज्ञानाला काही धोका निर्माण झाला तर NFT चे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते किंवा याचा उपयोग करणे अवघड होऊ शकते.

ब्लॉकचेन म्हणजे काय?

ब्लॉकचेन किंवा ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण क्रिप्टो करेंसी बरोबर इतर कोणत्याही डॉक्युमेंट चे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवू शकतो व त्याची नोंदणी करू शकतो. ब्लॉकचेन वर नियंत्रण ठेवणारी कोणतेही संस्था किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध नाही.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा विविध प्रकारे उपयोग केला जातो जसे की जमिनीची खरेदी-विक्री करणे, महत्वपूर्ण दस्तऐवज सांभाळून ठेवणे,नकली कागदा मुळे होणारे धोके थांबवणे, सायबर रक्षा बळकट करणे, मेडिकल डेटाची सुरक्षितता सांभाळने तसेच इतर अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी देखील ब्लॉकचेन उपयोगात आणला जातो.

NFT आणि क्रिप्टो करेंसी मधील फरक

NFT हे डिजिटल assets आहेत याउलट क्रिप्टो करेंसी हे डिजिटल करन्सी आहे.

NFT ला Non Fungible Tokens म्हणून ओळखले जाते तर क्रिप्टो करेंसी ला fungible टोकन म्हणून ओळखले जाते.

NFT चा उपयोग स्वामित्व दर्शवण्यासाठी होतो याउलट क्रिप्टो करेंसी चा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो.

Fungible आणि non fungible टोकन म्हणजे काय?

Fungible token-

Fungible token हे युनिक नसतात व त्यामध्ये आदला बदल होऊ शकते. या टोकन चे डिव्हिजन होऊ शकते.

Fungible टोकन चा उपयोग पेमेंट आणि व्हॅल्यू साठवण्यासाठी होऊ शकतो.

उदाहरण – बिटकॉइन, dogecoin तसेच इतर प्रकारांची क्रिप्टो करेंसी.


Non fungible token –

Non fungible token युनिक असतात व त्यामध्ये आदला बदल होऊ शकत नाही. ह्या टोकन चे डिव्हिजन    होऊ शकत नाही त्यामुळे याचा उपयोग विविध प्रकारचा डाटा साठवण्यासाठी होतो.

उदाहरण – ERC-721

आज आपण काय शिकलो?

NFT आजच्या काळात एक प्रगत तंत्रज्ञान आहे ज्याचा उपयोग विविधतेला साठविण्यासाठी व त्या डेटाचे स्वामित्व प्राप्त करण्यासाठी होतो तसेच आपण जाणून घेतले की NFT चे फायदे आणि तोटे कोणते आहे.

NFT च्या मदतीने आपण आपल्याकडे असलेल्या युनिक गोष्टीचे ऑनलाइन डिजिटल कॉपीराईट मिळवू शकतो

, म्हणजेच आपण डिजिटल मालक बनू शकतो या प्रक्रियांचा मुख्य फायदा हा आहे की एकदा NFT वर अपलोड झालेली युनिक गोष्ट परत NFT वर अपलोड करून उपयोगात आणता येत नाही.

मला आशा आहे तुम्हाला NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi हा लेख जरूर आवडला असेल.जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा व काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा.

Leave a Comment